
गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे
गांधीनगर (ता.करवीर)
येथे सिंधी बांधतांचा ‘चालियो महोत्सव’ भजन, कीर्तन, सत्संग अधा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गेल्या ४० दिवसांपासून हा महोत्सव सुरु होता, त्यादरम्यान सिंधी समाजातील महिला उपवास करतात. शेतटच्या दिवशी सांगता समारंभावेली शुक्रतारी झुलेलाल यांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ‘जय झुलेलाल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सिंधी समाजातील
मुर्तीनी लेझीम खेळून मिरवणुकीमध्ये उत्साह भरला होता. पंचगंगा नदीकरौल स्वामी
शांतिप्रकाश घाटानजीक बहराणा साहिवचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मनीष महाराज, दीपक महाराज, भास्कर महाराज यांच्यासह सखीबाई पोपटानी, रितु लालतणी, महेश पोपटानी, आशिष विधानी, शंकर वधाता, नानक सुंदरानी, प्रेम जसुजा, अशोक चंदवानी, गोपी चंदवानी, शंकर मनकानी यांच्यासह सिंधी बांधव सहभागी झाले होते.
गांधीनगर येथे सिंधी समाजबांधवांच्या ‘चालियो उत्सवाचा भक्तिमय वातावरणात सांगता मामारंभ झाला. यावेळी बहराणा साहिब यांची मिरवणूक काढण्यात आली.











