गांधीनगर/प्रतिनिधी:
उदय साळुंखे
सत्यम फाउंडेशन व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उंचगाव ता.करवीर येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वही, कंपास पेटी, पेनसह इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी २२ विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या संस्कारावरच पुढील कार्य चालू राहील.
यावेळी बोलताना सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे म्हणाले की, फाउंडेशन च्या वतीने यापुढेही समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांना आधार देण्याचे काम करू.
यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्तात्रय फराकटे, शाळा व्यवस्थापण समितीचे सचिन नागटिळक, प्रकाश मुदुगडे, शिवाजी लोहार, बाळासाहेब कांबळे, संदीप शेटके, अक्षय परीट, धनाजी पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे सर, नारायण बेळणेकर सर व सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.











