कोल्हापूर प्रतिनिधी – गेले अनेक दिवस झाले महाराणा प्रताप चौक कडून स्वयंभू गणेश मंदिर जवळ असणाऱ्या सिग्नल जवळ एका गटारीचे काम करण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी ड्रेनिज देखील असल्याने गटारीचे आणि ड्रेनिज चे पाणी एकत्रित होऊन रस्त्यावर येऊन ते घाण पाणी आणू त्यातील घाण ही त्या ठिकाणी असणाऱ्या गोरक्षनाथ मित्र मंडळ या ठिकाणी मांडवा जवळ पसरते गोरक्षनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल पोवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका उप शहर अभियंता सुरेश पाटील यांना ह्या बाबतीचे निवेदन दिले तसेच जर हे काम येत्या 4 ते 5 दिवसात न झाल्यास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले या वेळी गोरक्षनाथ मित्र मंडळाचे सदस्य अमित मोमिन,अमित कांबळे,धर्मेश सुर्वे,ओंकार हिरवे,शाहरुख हजारे,अझर खानवदे,उत्तम पोवार आदी उपस्थित होते.











