Edition

चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. सचिन बल्लाळ यांना ‘मानवाधिकार राजदूत’ सन्मान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड प्रतिनिधी : संजय आगाशे,
चंदगड तालुक्याचे सुपुत्र, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. सचिन सदानंद बल्लाळ (डॉक्टर) यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेच्या ‘मानवाधिकार राजदूत’ सन्मानाने गौरविण्यात आले. ग्लोबल पीस कौन्सिल आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अॅम्बेसेडर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

मानवाधिकारांचे संरक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण आणि समाजातील गरजू व वंचित घटकांसाठी केलेल्या विविध उपक्रमांबद्दल डॉ. बल्लाळ यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय व सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची विशेष दखल या सन्मानाच्या माध्यमातून घेण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बल्लाळ यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांकडून मिळालेल्या या गौरवामुळे चंदगड तालुक्याच्या सामाजिक कार्याचीही दखल व्यापक स्तरावर घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. बल्लाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. समाजातील दुर्बल घटकांना मदत, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न, सामाजिक जागृती तसेच आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, डॉ. सचिन सदानंद बल्लाळ यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल चंदगड तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. चंदगडच्या सुपुत्राला मिळालेला हा सन्मान तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!