Edition

इनाम म्हाळुंगे गावचे सुपुत्र हवालदार नामदेव आनंदा गावडे यांना वीरमरण.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील इनाम म्हाळुंगे गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार नामदेव आनंदा गावडे यांना देशसेवा बजावताना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच इनाम म्हाळुंगे परिसरासह चंदगड तालुक्यात शोककळा पसरली.

हवालदार नामदेव गावडे यांनी भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावताना देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी देशसेवेचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले. त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेला आणि सर्वोच्च बलिदानाला संपूर्ण गावकऱ्यांकडून भावपूर्ण अभिवादन करण्यात येत आहे.

गावातील एक कर्तव्यदक्ष जवान देशासाठी शहीद झाल्याने इनाम म्हाळुंगे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावडे कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी असून, हवालदार नामदेव आनंदा गावडे यांच्या वीरमरणाला शतशः नमन!

भारत माता की जय!
वीर जवान अमर रहे!

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!