Edition

चि. प्रकाश आणि चि.सौ.का. अमृता यांचा विवाह सोहळा मंगलाष्टकांच्या मंगल स्वरात उत्साहात संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी: उदय साळुंखे

काळज (फलटण):
सॉफ्टवेअर इंजिनिअर चि. प्रकाश आणि चि.सौ.का. अमृता यांचा विवाह सोहळा गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:३८ वाजता श्रीदत्त गार्डन मंगल कार्यालय, काळज (ता. फलटण, जि. सातारा) येथे अत्यंत मंगलमय वातावरणात आणि भव्य उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याप्रसंगी दोन्ही कुटुंबांतील नातेवाईक, आप्तेष्ट, राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उपवर-वधूंना भावी आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
निमंत्रक श्री. सुरेश श्रीपती माडकर, सौ. लता सुरेश माडकर, श्री. रोहित सुरेश माडकर आणि सौ. प्रिया रोहित माडकर यांनी आलेले सर्व पाहुणे, आप्तेष्ट व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!