Edition

मलिकवाडला नागपंचमीनिमित्त दही-हंडी सोहळा उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड, ता. चिकोडी : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नागपंचमीनिमित्त सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहा वाजता दही-हंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

गावातील दही-हंडीचे मानकरी असलेले अशोक ठकप्पा खोत यांच्या कुटुंबाकडे यंदाची मानाची दही-हंडी असल्याने त्यांच्या हस्ते दही-हंडी फोडून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने मलिकवाड परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी (ता. १६) सकाळी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या नागोबाच्या प्रतिमेचे देवघरात विधिवत पूजन करण्यात आले. सोमवारी नागपंचमीनिमित्त मंदिरातील तसेच घरातील नागोबाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

सकाळी नऊ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून वारकरी चंद्रकांत आंबी यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध मार्गांवरून हंडीची मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान भाविकांनी हंडीला लाह्या व दही अर्पण करून भक्तिभाव व्यक्त केला. त्यानंतर दुपारनंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला.

सायंकाळी मंदिर परिसरात गावकरी व भाविक मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी मानकरी अशोक ठकप्पा खोत यांच्या हस्ते दही-हंडी फोडण्यात आली. दही-हंडी फोडण्याचा क्षण पाहण्यासाठी मंदिर परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती. युवक-युवतींसह नागरिकांनी या सोहळ्याचा उत्स्फूर्त आनंद लुटला.

नागपंचमीच्या निमित्ताने गाव परिसरात युवक व युवतींनी झोपाळ्याचा खेळ खेळत आनंदोत्सव साजरा केला.

धार्मिक कार्यक्रम, भजन, हंडी मिरवणूक आणि दही-हंडी सोहळ्यामुळे संपूर्ण मलिकवाडमध्ये दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहात नागपंचमी सणाची सांगता झाली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!