Edition

स्वराज्य स्केटिंग अकॅडमी खेळाडूंचा 5 तास स्केटिंग चा विश्वविक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – १५ ऑगस्ट ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगलीच्या एमआयटी स्कूलच्या स्केटिंग ग्राउंड वर शंभर स्केटिंग खेळाडूंनी सलग पाच तास स्केटिंग करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.या रेकॉर्डमध्ये वय वर्ष तीन वर्षापासून 17 वर्षापर्यंत मुलांनी सहभाग नोंदविला. या विश्वविक्रमाचे उद्घाटन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुते मॅडम तसेच एमआयटी स्कूलचे प्राचार्य चेतन सोनवणे सर यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस समारंभ डॉक्टर महेश होनमोरे व रितेश बारिताया यांच्या हस्ते करण्यात आला, या विक्रमाची नोंद रॉयल युरो बुक ऑफ रेकॉर्ड, द अमेरिकन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन, सुपर स्पोर्ट्स रेकॉर्ड या चार बुक मध्ये झाली असून या रेकॉर्डचे सर्व नियोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सुरज शिंदे सौ परवीन शिंदे आयेशा मुलानी, विनायक पाटील, आशुतोष फुटाणे, शुभांगी कांबळे यांनी केले. या रेकॉर्डमध्ये सलग पाच तास मुलांनी स्केटिंग करत यशस्वीरित्या सहभाग घेतला यामध्ये स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी उचगाव यामधील आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, 1) रणविजय भोसले 2) अभिमन्यू पाटील 3) आराध्या परब 4) सिद्धार्थ काळे 5) हर्ष जाधव 6) अथर्व जाधव 8) स्वरा दोडमनी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर रेकॉर्ड यशस्वी करण्यासाठी पंकजसिंह देशमुख,अहद मुलानी,गौराज कांबळे यांनी परिश्रम घेतले तसेच खेळाडूंचा कौतुक सोहळा पंचायत समिती सदस्य सौ संगीता बाळासाहेब यादव, छत्रपती विकास संस्था चेअरमन श्री बाळासाहेब यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप पाटील,सौ.वैजयंती यादव,श्री.मधुकर चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.शामराव यादव उचगाव ग्रामपंचायतचे तसेच सर्व कार्यकर्ते यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन व फेटे बांधून उल्लेखनीय नावलौकिक मिळवल्याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला. या सर्व स्केटिंग खेळाडूंना प्रोत्साहन प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सौ. शुभांगी कांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले अध्यक्ष विजय जाधव सर व सर्व पालक तसेच सदस्य यांचे सहकार्य लाभत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!