Edition

विद्या मंदिर शाहूनगर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी: उदय साळुंखे

गडमुडशिंगी विद्या मंदिर शाहूनगर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राम आवळे, अभिषेक थोरात, उदय हवळ, राहुल कदम, शंकर दाबीलकर, मुकेश प्रजापती, विजय करंडे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर, शिक्षिका देवशाला मुंडे, अंगणवाडी सेविका नंदा सोनुले, श्वेता देशमुख, व्यवस्था समितीच्या अध्यक्षा शीतल कदम तसेच पुष्पा नागावे, रूपाली माळी, सोनाली माळगे, गायत्री सोनुले, सखिना लगेवाले, गीता आवजवक, प्रतीक्षा वायदंडे, सूर्या माळी आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शाळेसाठी सदैव सहकार्याची ग्वाही

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ थोरात यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “शाळेला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत असेल तर आवर्जून सांगा. शाळेसाठी आम्ही कायम तत्पर आहोत. जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची शाळा आहे. ही शाळा कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास आम्ही तयार आहोत.”

पत्रकार विशाल फुले यांचे मनोगत

यावेळी पत्रकार विशाल फुले यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि देशप्रेमाची जपणूक विद्यार्थ्यांनी करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका मैत्राली खटावकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ व सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्या मंदिर शाहूनगर येथील ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!