Edition

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व दिमाखात संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास मा. अनिल डाळ्या साहेब, उपमहापौर, इचलकरंजी महानगरपालिका यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मा. सतीश पंडित साहेब, भाजप जिल्हा सरचिटणीस, मा. प्रकाश मोरबाळे साहेब, माजी उपनगराध्यक्ष, मा. सुनील मांगलेकर, अध्यक्ष, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशन मा. सुभाष कुराडे सर, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, मा. महेश खांडेकर सर, मा. राजू नदाफ सर,शाहू महाराज विद्यार्थी फोंडेशन चे पदाधिकारी, मा. भीमराव बन्ने, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, तारदाळ, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार सर व पी. ए. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मा. सतीश पंडित साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे मा. अनिल डाळ्या साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, संविधान व देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
मुख्याध्यापक शंकर पोवार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. उपमहापौर मा. अनिल डाळ्या साहेब यांचा सत्कार मा. सुनील मांगलेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी इयत्ता ७ वी व ८ वीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तर व जिल्हास्तर गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप विभाग प्रमुख पी.जी.पाटील सर व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना मा. अनिल डाळ्या साहेब यांनी शाळेला आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या वतीने डिजिटल वर्गाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत, आकर्षक पिरॅमिड आणि कु. जेसिका माने हिने सादर केलेले ‘तिरंगा’ देशभक्तीपर नृत्य विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, उत्स्फूर्त आणि मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाधव मॅडम यांनी केले, तर पी. ए. पाटील सर यांनी आभार मानले. प्रशालेची आकर्षक सजावट व भव्य रांगोळी कलाशिक्षक महेश निंबाळकर सर यांनी साकारली. गीतांची तयारी सौ.एस.बी.ढोले मॅडम,संगीत कवायत व पिरॅमिडची तयारी क्रीडा शिक्षक तुषार जगताप सर यांनी करून घेतली. फलक लेखन सिद्धाराम पोवार सर व पी. एल. पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली शपथ सामूहिकरीत्या घेण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील कलाशिक्षक महेश निंबाळकर सर व मनोज भंडारे सर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.
“स्वातंत्र्याचा अभिमान, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प!” या प्रेरणादायी भावनेने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात, दिमाखात आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!