Edition

सांगलीच्या रेठरे धरण येथील विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलच्या कॅन्टीनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरात सैनिक स्कूलची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमधून अधिकाधिक विद्यार्थ्यांची NDA साठी निवड व्हावी, यासाठी संस्थेने सातत्यपूर्ण व प्रभावी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी चंद्रकांतदादांनी केले.

तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार NDA प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये NDA प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच सामाजिक दायित्व निधी (CSR) मधून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलचे सचिव तथा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार धैर्यशीलदादा कदम, जिल्हा परिषद सदस्या मोहिनी खोत, सरपंच संदीप खोत, सी. बी. पाटील, डी. के. पाटील, प्राचार्य बसवराज एच. यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!