Edition

जिवंत नागपूजेसाठी ४१ ठिकाणी परवानगी; ३२ शिराळ्याच्या परंपरेला अधिकची गती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी : ३२ शिराळ्याची ऐतिहासिक आणि पारंपरिक ओळख असलेल्या जिवंत नागपूजा व समाजप्रबोधनाच्या उपक्रमासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ४१ ठिकाणी परवानगी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी दिली.

आमदार सत्यजित देशमुख म्हणाले :- गेली २३ वर्षे बंद असलेला आणि शेकडो वर्षां पासुन शिव गोरक्षनाथांनी व ग्रामदैवत अंबामातेचा कृपेने सुरू असलेला शिराळ्याचा पारंपरिक नागपंचमी उत्सव पुन्हा साजरा करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. गत वर्षी 21 लोकांना जिवंत नागपूजा व समाजप्रबोधनाच्या उपक्रमासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ठिकाणी परवानगी मिळाली होती. या वर्षी यामध्ये वाट होऊन 41 लोकांना परवानगी मिळावी आहे. या निर्णयामुळे ३२ शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी उत्सवाला तसेच संबंधित धार्मिक व सामाजिक उपक्रमांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिवंत नागपूजेची परंपरा, तिचे ऐतिहासिक महत्त्व आणि नागपंचमीच्या माध्यमातून होणारे समाजप्रबोधन यामुळे शिराळ्याची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परवानगी मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रजी यादव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, वनमंत्री गणेशजी नाईक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादा, खासदार धैर्यशील माने,आमदार सदाभाऊ खोत तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी आभार व्यक्त केले.
दरम्यान, “जिवंत नागाची पूजा” ही ३२ शिराळ्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली बाब आहे. परंपरेचे जतन करताना शासनाने घालून दिलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करून नागपंचमी उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयाबद्दल ३२ शिराळकरांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारसह सर्व संबंधितांचे मनःपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!