Edition

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची ‘सायकल’ची साथ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रांगोळी प्रतिनिधी : माळभागासह गावातील दूरच्या भागातून दररोज पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने कुमार विद्यामंदिर रांगोळी येथील गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात पाऊस, चिखल आणि लांबचे अंतर पार करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकलींमुळे मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा ये-जा करण्याचा वेळ वाचून अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
कुमार विद्यामंदिर रांगोळी येथील काही विद्यार्थी माळभाग तसेच गावातील लांबच्या भागातून दररोज शाळेत येतात. शाळेत येण्यासाठी त्यांना बराच वेळ पायी प्रवास करावा लागत असल्याने विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांचा हा त्रास लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्याकडे गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकलींची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत रोटेरियन शीतल उपाध्ये, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी (एक्झिक्युटिव्ह) तसेच रोटेरियन सुनील मांगलेकर, बोर्ड ऑफ डायरेक्टर व प्रोजेक्ट चेअरमन यांनी तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या.यावेळी रोटेरियन शीतल उपाध्ये म्हणाले, “विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, हा रोटरीचा प्रयत्न आहे. सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, हा वेळ ते अभ्यासासाठी उपयोगात आणतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रगतीला निश्चितच हातभार लागेल.”रोटेरियन सुनील मांगलेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्या शिक्षणाला आवश्यक ते पाठबळ मिळावे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचावी, या उद्देशाने रोटरी क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. रांगोळी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही शक्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील.
रोटरी क्लब ऑफ यांच्यावतीने सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य या उपक्रमाचे समाधान व्यक्त करणारे ठरले. शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस या मदतीचा निश्चितच फायदा होणार आहे.
यावेळी कुमार विद्यामंदिर रांगोळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित देवणे, उपाध्यक्ष क्रांतीकुमार शेटे, मुख्याध्यापक संजय चिगरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर करून त्यांच्या भविष्यासाठी हातभार लावणाऱ्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!