Edition

सरकारी माध्यमिक विद्यालय, सदलगा येथे धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या वतीने ‘आरोग्य संकल्प’ कार्यक्रम उत्साहात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी – सदलगा (ता.चिकोडी) येथील ,दि. ३ ऑगस्ट : धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या वतीने सरकारी माध्यमिक विद्यालय, सदलगा येथे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि निरोगी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने ‘आरोग्य संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री. बाळासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, स्वच्छ परिसर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. चांगले आरोग्य हेच यशस्वी जीवनाचे खरे भांडवल असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधीर गौंडी यांनी धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांचा लाभ घेऊन आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात, असे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास धर्मस्थळ ग्रामविकास योजनेचे प्रकल्प अधिकारी श्री. सोमेश्वर, संघाचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहशिक्षक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अनिलकुमार डेकनावर सदलगा.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!