Edition

नंदीकुरळीत विहिरीत आढळली मगर; वनविभागाने पकडून दिले सुरक्षित अधिवासात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग/प्रतिनिधी : तालुक्यातील नंदीकुरळी गावातील शेतकरी बाळकृष्ण वागे यांच्या विहिरीत मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विहिरीत मगर असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मगरीला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर तिला नैसर्गिक व सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.
या कारवाईमुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वनाधिकारी उमेश प्रमंदिरी यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी श्रीशैल सद्दी, पृथ्वीराज जाधव, राजू सावंत, महेश सावंत, आप्पासाहेब जकाठी, चिदानंद हिरेकुराबर, विठ्ठल हिरेकुराबार यांच्यासह ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!