Edition

कोल्हापुरात विनापरवाना लॉजिंग व्यवसायांवर महापालिकेची धडक कारवाई; दोन लॉज सील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यावसायिक आस्थापनांविरोधात मंगळवारी धडक कारवाई करत दोन लॉजवर सील ठोकले. परवाना विभाग, अग्निशमन विभाग, घरफाळा विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक २ यांच्या संयुक्त पथकाने दसरा चौक येथील ‘ग्रेस लॉजिंग’ तसेच लक्ष्मीपुरी येथील ‘श्री महालक्ष्मी यात्री निवास’ या दोन आस्थापनांवर ही कारवाई केली.
महापालिकेकडून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नवीन परवाना मिळविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित लॉज सील केले. तसेच, ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज करूनही आवश्यक कागदपत्रे सादर न केलेल्या चार आस्थापनांना यावेळी समज देण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार उपआयुक्त किरणकुमार धनवाडे आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
शहरातील सर्व व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून नियमांचे पालन करावे, अन्यथा विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!