
हुपरी प्रतिनिधी – हुपरी नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार गटर स्वच्छता कचरा संकलन कामगारांच्या मागण्या मान्य केल्या मुख्याधिकारी अजय नरळे व हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय सत्यवान हाके यांनी मध्यस्थी करत त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना तसे लेखी पत्र देत उद्यापासून कामाला सुरुवात करण्याचे सूचना करण्यात आल्या गेली 10 दिवस झाले हुपरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी या आंदोलनाच्या आज आमरण उपोषण सुरू होण्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य करत गावातील सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार अशोकराव माने माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्याकडे मंत्रालयात भेटून पाठपुरावा करण्यात आला कामगारांच्या पाठीशी एकजूट दाखवल्याने अखेर त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना किमान वेतन आयोग प्रमाणे व पीएफ पीएसआय सुविधा लागू करत तात्काळ त्यांचे वेतन आदा करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी तसे पत्र कामगार संघटनेला दिले हे उपोषण सरबत देऊन सोडवण्यात अखेर मुख्याधिकारी अजय नरळे यांना यश आले .या आंदोलनासाठी कामगार संघटनेचे संजय कांबळे (बापू) हुपरी मनसे जिल्हाप्रमुख दौलतराव पाटील अखिल भारत हिंदू महासभा उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, संजय पाटील,नितिन काकडे,शिवसेना तालुकाप्रमुख अजित सुतार माजी सरपंच सुभाष कागले सामाजिक कार्यकर्ते अशोकराव खाडे धर्मवीर कांबळे माजी नगरसेवक रफीक मुल्ला शिवसेना शहरप्रमुख विनायक विभुते, पत्रकार सागर पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव,आदी सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते..










