खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याची,तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची त्यांच्या राजकीय नेतृत्वाची माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका,
शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
श्री.एफ.आय.शिकलगार यांनी केले तर आभार श्री.रजपुत बी.डी यांनी मानले.











