Edition

कानूर खुर्द येथे ‘एक दिवस माझा बळीराजासाठीं उपक्रमांतर्गत कृषिक्षेत्राला चालना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे/ चंदगड प्रतिनिधी :- कानूर खुर्द ता.चंदगड येथील शासनाच्या विकासात्मक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यासाठी माझा ‘एक दिवस माइया बळीराजासाठी हा शासनाचा नवा उपक्रम कृषीक्षेत्राला’ चालना देणारा ठरला.कानूर खुर्द येथे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयांवरील मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान,वृक्ष लागवड,नाचणी बियाणे वाटप तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यासाठी उपाय योजना कशी राबवावी याबद्दल मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले
कार्यक्रमास समन्वय अधिकारी अश्विनकुमार कचरे,पंचायत समिती सदस्य मनस्विनी कांबळे सहायक कृषी अधिकारी नामदेव पालव ग्राम विकास अधिकारी अश्विनी धुमाळे,ग्राम विकास अधिकारी अंकुश पाटील,कानूर खुर्दचे सरपंच गुंडू कबाडी,उपसरपंच अंबादास पाटील तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती जाणुन घेत लाभ घेण्याबाबत उत्सुकता दर्शविली.कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना सुधारित शेती तंत्रज्ञान आणि उपलब्ध योजनांची उपयुक्त माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!