Edition

ईश्वरपूर तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’च्या पूर्वतयारीचा आढावा..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – ईश्वरपूर तहसील कार्यालयात आज ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’च्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक आ. सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. येत्या २२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराच्या नियोजनासह विविध शासकीय विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांना महसूल व इतर शासकीय विभागांच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
बैठकीत शिबिराच्या आयोजनासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या, नागरिकांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखून शिबिर यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागांनी शिबिराची तयारी वेळेत पूर्ण करून नागरिकांना प्रभावी सेवा देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!