Edition

सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या 96 व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

विशाल क्रांती वृत्तसेवा – इचलकरंजी येथील सहकारमहर्षी तथा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या 96 व्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहरातील विविध महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कार्यक्रम विद्यमान आमदार राहुल आवाडे व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमातून शेकडो विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या राणी लक्ष्मीबाई विद्यामंदिर शाळा क्र. 13, एपीजे अब्दुल कलाम उर्दू शाळा क्र. 57 (तोरणा नगर), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळा क्र. 30 तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्दू शाळा क्र. 3 (सोलगे मळा) येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी समीर मुल्ला, सचिन हेरवाडे, कृष्णा निकम, पांडुरंग सोलगे, सावित्री कुंभार, राजश्री जाधव, सविता डेंगणे, आदित्य कबाडे, सुनील भोने, दशरथ मोहिते, अशोक चव्हाण आणि उत्तम चोथे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिक्षण घेण्याचे, शिस्त, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!