Edition

येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला १५ नियमित पदांची मंजुरी; आमदार सत्यजित देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी : तालुक्यातील येळापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने १५ नियमित पदांना मंजुरी दिली असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार सत्यजित देशमुख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

राज्य शासनाने नव्याने मंजूर करण्यात येणाऱ्या २८ बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक नियमित पदांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली असून, त्यानुसार २८ केंद्रांसाठी एकूण ४२० पदांना मान्यता देण्यात आली आहे.

येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांमध्ये २ वैद्यकीय आरोग्य अधिकारी (गट-अ), २ आरोग्य सहाय्यक, १ सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम), १ औषध निर्माता (फार्मासिस्ट), १ कनिष्ठ लिपिक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ आरोग्य सहाय्यक, १ स्त्री परिचर, ३ पुरुष परिचर, १ वाहनचालक आणि १ सफाईगार अशा एकूण १५ नियमित पदांचा समावेश आहे.

या मंजुरीमुळे येळापूरसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा, औषध वितरण तसेच रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे जाळे मजबूत करण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यातून येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियमित पदांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

चौकट

येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक असणारी सर्व पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. आज शासनाने याबाबतचा अध्यादेश काढला असून पद मान्यता मिळाली आहे. लवकरच पदस्थापना होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईल.

आमदार सत्यजित देशमुख.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!