Edition

भाजप पुणे शहराच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी गणेश शेरला; संघटनशक्तीला नवी धार,…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तीन दशकांच्या सामाजिक- राजकीय अनुभवाची दखल; धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके सातत्याने कार्यरत असलेले, एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांची भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गणेश शेरला यांनी गेल्या तीन दशकांत सामाजिक बांधिलकी जपत विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष, पर्वती उपाध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या दीर्घ सामाजिक व राजकीय अनुभवाचा लाभ पुणे शहरातील पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी होईल, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने प्रेरित होऊन पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे यशस्वीपणे पालन कराल आणि भारतीय जनता पक्षाचा विचार अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचवाल, असा विश्वास व्यक्त करत धीरज घाटे यांनी गणेश शेरला यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!