Edition

विहिरीत पडलेल्या वानर व पिल्लाला वन विभागाकडून जीवनदान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द शेतशिवारात २५ जून दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोपाल भानुदास लोखंडे यांच्या शेतातील विहिरीत एक वानर व त्याचे पिल्लू पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच वन विभागाला माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ बचावकार्य सुरू केले. विहिरीत अडकलेल्या वानर व त्याच्या पिल्लाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे दोन्ही वन्यजीवांना जीवनदान मिळाले.
या बचावकार्यात परिसरातील शेतकरी उपस्थित होते. वानर व पिल्लू सुखरूप बाहेर काढल्यानंतर उपस्थितांनी वन विभागाच्या कार्याचे कौतुक केले. वन्यजीव संरक्षणासाठी वन विभाग सातत्याने प्रयत्नशील असून अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!