Edition

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोतांचा पुढाकार; मोटार केबल चोरीप्रकरणी तक्रारी नोंदविण्याच्या सूचना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बागणी प्रतिनिधी : बागणी नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, या प्रकरणात तक्रार दाखल करताना अनेकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. याची दखल घेत शेतकरी नेते तथा ज्येष्ठ आमदार सदाभाऊ खोत यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित तक्रारी त्वरित नोंदवून घेण्याबाबत सूचना केल्या.
या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, चोरीच्या घटनांबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची भूमिका पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाली.
“शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे माझा प्रश्न,” या भूमिकेतून त्यांनी संबंधित प्रकरणात पुढाकार घेत शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!