Edition

सलग दुसऱ्या दिवशी फार्णेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – वाळवा तालुक्यातील फार्णेवाडी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुलाजवळील झाडावर बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर काही वेळातच फार्णेवाडी येथील दत्त मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेल्या शेतात बिबट्याच्या बछड्याचेही दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वारंवार आढळून येत असून, सलग दुसऱ्या दिवशीही दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर शेतात जाण्यास तसेच जनावरे चारण्यासाठी बाहेर काढण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करूनही बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!