Edition

भाऊबीजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ. सत्यजित देशमुख यांनी घेतली भेट; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश सुपूर्द!.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची आज आमदार सत्यजित देशमुख यांनी भेट घेत भाऊबीज सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश आमदार सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने केलेल्या या आर्थिक योगदानाचे विशेष महत्त्व आहे. सणाच्या आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपत आमदार सत्यजित देशमुख यांनी मदतीचा आदर्श उपक्रम राबविला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!