Edition

दूधगंगा पुलावर काळाचा घाला, २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा वार्ताहर, अनिलकुमार डेक्कण्णावर, सदलगा येथील दूधगंगा नदी पुलापलीकडे बोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.

उत्तम दयानंद कांबळे, वय २७, रा. ढोणेवाडी, ता. निपाणी, सध्या वास्तव्य बावन सौंदत्ती, ता. रायबाग असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत प्रज्वल अशोक अस्नोडे, रा. बावन सौंदत्ती हा होता. हा अपघात काल रात्री साडेसातच्या सुमारास झाला. याबाबत मृताची आई लता दयानंद कांबळे यांनी सदलगा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सदलगा पोलिसांतून एसआय एस. एम. सनदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम कांबळे हा बोरगावकडे जात होता. दूधगंगा नदी पुलापलीकडे रस्त्यात थांबलेल्या ट्रॅक्टर (ट्रॅक्टर क्र. एमएच-०९/सीजे-१०१२, ट्रॉली क्र. केए-२३/एआय-२९६८) च्या मागील बाजूला उत्तम कांबळे याने निष्काळजीपणाने दुचाकी (होंडा एसपी क्र. केए-२३/ईएच-१९८७) चालवत जोराची धडक दिली. त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मृत्यूमुखी पडला.

या अपघाताची नोंद सदलगा पोलिसांत झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!