सांगली प्रतिनिधी – कामेरी येथे आज सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच उपस्थितांना अ वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संजय थोरात व प्रकाश कदम यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजीच का साजरा केला जातो, याविषयी ऐतिहासिक संदर्भांसह उपस्थितांचे प्रबोधन केले. त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेतील राज्याभिषेकाचे महत्त्व विशद केले.
यावेळी तेजस पाटील यांनी शिवगारद’ सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी केले.
या कार्यक्रमास कामेरी गावचे लोकनियुक्त सरपंच रणजीत पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील छाया पाटील, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, प्रा. अनिल पाटील, प्रा. संजय पाटील, सचिन जाधव, पोपट पाटील, संतोष माळी, संजय पाटील, विजय कांबळे, बापुसो कांबळे, मानसिंग कांबळे, प्रविण कांबळे, संतोष बाबर, इंद्रजित पाटील, रणजित पाटील, सुधीर पाटील, अमोल पाटील, स्वप्निल कदम, तानाजी जाधव, शशीकांत पाटील, दिलीप जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प व्यक्त केला.










