Edition

वाल्मिकी समाजातील सफाई कर्मचारी वरील हल्ल्याच्या निषेधार्थ ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा मेहतर वाल्मिकी महासंघ पुणे शहराची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
मेहतर वाल्मिकी समाजातील सफाई कर्मचारी धीरज मोहन बैद यांच्यावर झालेल्या प्राणघात हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने हल्ला करणाऱ्या गुन्हेगारावर 307 कलम अंतर्गत ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मेहतर वाल्मिकी समाजातील शिष्टमंडळ कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गाडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी मेहतर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष रवी परदेशी,पुणे शहर सचिव नरेश जाधव, माजी नगरसेवक सुधीर जामजोत, डॉ. अनुपम बेगी,कविराज संघेलीया, चंद्रकांत किसन चव्हाण, चेतन जेधे, विशाल चव्हाण, ऋषीराज जिनवाल, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!