Edition

मृत ऐरावती खोत संशयित संजय चव्हाण अनैतिक संबंधातून नणदीवाडी येथील महिलेचा खूण आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचे सापडले अवशेष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

माझ्यासोबत अनैतिक संबंध पूर्ववत ठेव अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करू असे वारंवार धमकावणाऱ्या व विवाहास अडथळा ठरणाऱ्या नणदीवाडी येथील प्रेयसीचा प्रियकराने खून केल्याची घटना चिकोडी बेळगाव रस्त्यावरील चण्यानदड्डी घाटात असलेल्या जंगलात उघडकीस आली आहे. नणदीवाडी (या. चिकोडी) येथील ऐरावती संजय खोत (वय 38 )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
संजय चव्हाण (वय 28) मुळगाव नरेनुर एलटी 2 (जिल्हा बागलकोट) सध्या राहणार यादगूड (हुक्केरी)असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की काही वर्षांपूर्वी नणदीवाडी हिरेकोडी नजीक एकाच हॉटेलमध्ये एकत्र काम करताना खून झालेल्या महिलेसोबत संजय चव्हाण या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. सदर महिला 14 नोव्हेंबर रोजी घरातून तोरणहळ्ळी येथे मैत्रीणीसोबत दर्शनासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. याविषयी घरच्यांनी चिकोडी पोलीस स्थानकात बेपत्ता तक्रार दाखल केली होती.

चिकोडी पोलिसांनी तपास केला असता सीडीआर वरून आरोपीचा पत्ता लागला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने आपणच खून केल्याचे कबूल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माझे या महिलेसोबत अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. पण अलीकडच्या काळात मी लग्न करून घेण्याचा निर्णय घेतला होता. याला वारंवार सदर महिला विरोध करत होती. दोन वेळा माझे ठरलेले लग्न या महिलेमुळे मोडले. वारंवार पैशाची मागणी देखील करत होती. तू माझ्याशी शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली होती. याला कंटाळून मी तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

यावेळी सध्या यादगुड येथील धाब्यामध्ये आचारी म्हणून काम करणारा संजय तोरणहळ्ळी येथे आलेल्या खून झालेल्या महिलेला जाऊन भेटला. तिला चण्यानदड्डी घाटात घेऊन जाऊन रस्त्याच्या शेजारी असलेल्या जंगलामध्ये तिचा दगड व बिअरच्या बाटलीने खून केला. त्यानंतर जंगलामध्ये अर्धा किलोमीटर आत मृतदेह फरपटत नेऊन टाकून गेला होता.
घटनास्थळी सदर आरोपीला घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी मृतदेहाचा शोध घेतला. जंगलामध्ये अर्धा किलोमीटर आत झुडपामध्ये महिलेच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. मृतदेह कुजला असून केवळ हाडे मात्र आढळून आली. तसेच साडी व परिधान केलेले वस्त्र सापडले. पोलिसांनी संपूर्ण परिसर शोधून काढला.
घटनास्थळी बेळगाव येथून आलेले फॉरेन्सिक पथकाने देखील भेट देऊन नमुने ताब्यात घेतले.

सदर महिलेला पती व दोन मुले असून खून झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरले आहे. आरोपी तरुण अविवाहित असून सदर आरोपीला न्यायालया समोर हजर करून चिकोडी पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे चिकोडी करोशी, नणदी, नणदीवाडी परिसरात खळबळ माजली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

३५ वर्षांपासून प्रलंबित डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविले; नागरिकांना मोठा दिलासा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेची जेसीबीद्वारे धडक कारवाई; जिल्हा सचिव सतीश माळगे दादांच्या पाठपुराव्याला यश

traffic tail

३५ वर्षांपासून प्रलंबित डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविले; नागरिकांना मोठा दिलासा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेची जेसीबीद्वारे धडक कारवाई; जिल्हा सचिव सतीश माळगे दादांच्या पाठपुराव्याला यश

error: Content is protected !!