कबनूर प्रतिनिधी – ता. २४ : इचलकरंजी या वखनगरलगत असलेल्या कबनूरमधील लोकसंख्या सुमारे ७५,००० झाली आहे. तसेच परिसरातील औद्योगिक वसाहती, स्पिनिंग मिल, ऑइलमिल, प्रॉसेस, फाउंड्री आदी उद्योगांमुळे, व्यवसायामुळे कबनूर व परिसरात बहुगावचे लोक मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेले आहेत. त्याचबरोबर उद्योग व्यवसायानिमित्त प्रगतायी लोकांचाही वावर आहे.
उद्योगधंद्यांत हेवदावे, राजकीय हेवदावे, व्यसनाधीनतेतील वाढ यामुळे खुनाच्या घटना किंवा खुनी हल्ले, गुंडगिरी, हाणामाऱ्या, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, चोऱ्यांच्या घटना यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शांतता व सुव्यवस्था यासाठी कबनूरला स्वतंत्र पोलीस ठाणे होणे काळाची गरज बनली आहे.
येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार चौकात इचलकरंजी-कोल्हापूर रस्त्यावर शिवाजी नगर पोलीस ठाणे, तर कबनूर पोलीस चौकी आहे, पण तेथे कायमस्वरूपी पोलीस नसल्याने ही पोलीस चौकी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून कबनूरमधील नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी इचलकरंजीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जावे लागते.
कबनूर गाव हे इचलकरंजी शहरालगत असून खूप वर्षांपूर्वी जोडले गेले आहे. तसेच चंदूर आंबार फाटा ते कोरोचीचा घनगर माळ, इचलकरंजी-कोल्हापूर नाका ते तिळवणी, र्हंद फाटा ते कबनूर-शहापूर असा सुमारे दहा किमीचा विस्तार कवनूरने धारण केला आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अवैध धंद्यांचा चाप बसवण्यासाठी कबनूरमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे होणे काळाची गरज बनली
■ इचलकरंजी, कबनूर, कोरोचीच्या सीमा संपुष्टात आल्याने इचलकरंजीत गुन्हे करून गुंड प्रवृत्तीचे लोक लपण्यासाठी या दोन गावांचा आश्रय घेतात. कबनूर गाव इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर कोरोची गाव हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने एखादा गुन्हा घडला तर कोणत्या पोलीस ठाण्याने तपास करावा, असा संभ्रम पोलीसांमध्ये निर्माण होतो.









