Edition

सेलूत उद्या शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनावर मार्गदर्शन सत्र.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि.24 सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने तेजज्ञान फाउंडेशनच्या सहकार्याने बुधवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजता साई नाट्य मंदिर येथे शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना विविध आव्हानांसह मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांसमोर दुष्काळ, शेतीतील अनिश्‍चितता आणि आर्थिक अडचणींचे संकट आहे, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धा, परीक्षेचा ताण आणि करिअरविषयक चिंतांनी ग्रासले आहे. या पार्श्‍वभूमीवर सकारात्मक विचारसरणी, मानसिक स्वास्थ्य आणि आत्मविश्‍वासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘तणावमुक्त जीवन जगुया, मात दुष्काळावर करूया’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात ‘हॅप्पी थॉट्स – तेजज्ञान फाउंडेशन’च्या वतीने सकारात्मक विचारांची दिशा, मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणावमुक्त जीवनशैली, आत्मविश्‍वास, निर्णयक्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीतून सावरण्याची मानसिक क्षमता याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटांमुळे शेतकर्‍यांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्पर्धा आणि परीक्षेच्या तणावाला आत्मविश्‍वासाने सामोरे जावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मनातील आशा आणि आत्मविश्‍वास कायम ठेवून सकारात्मक विचारांच्या बळावर संकटांवर मात करता येते, हा संदेश या सत्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. सेलू व परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या मार्गदर्शन सत्राला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

३५ वर्षांपासून प्रलंबित डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविले; नागरिकांना मोठा दिलासा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेची जेसीबीद्वारे धडक कारवाई; जिल्हा सचिव सतीश माळगे दादांच्या पाठपुराव्याला यश

traffic tail

३५ वर्षांपासून प्रलंबित डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविले; नागरिकांना मोठा दिलासा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेची जेसीबीद्वारे धडक कारवाई; जिल्हा सचिव सतीश माळगे दादांच्या पाठपुराव्याला यश

error: Content is protected !!