
सदलगा प्रतिनिधी -अनिलकुमार डेक्कन्नावर,
सहकार, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक असे विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेले, बोरगाव पट्टणाचे सुपुत्र, क्रांतिकारी हरितकार, युवा सहकार धुरंधर, युवकांचे आदर्श, अभिनंदन रावसाहेब पाटील हे खऱ्या अर्थाने क्रियाशील धुरीण आहेत.
शेतकरी, बेरोजगार, कामगार आणि सामान्य जनतेबद्दल त्यांना अपार कळकळ आहे. बोरगावच्या अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून कर्तृत्वाचा वसा जपत, विविध अंगसंस्थांच्या विकासाबरोबरच सामान्य माणूस, गरीब, बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी ते आधार ठरले आहेत. अरिहंत उद्योग समूहाच्या विविध अंगसंस्थांमध्ये सुमारे १८०० युवक आणि २०० युवतींना उद्योगात रोजगार मिळाला आहे. समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत.
कर्नाटक राज्य ज्वेलर्स असोसिएशन, बेंगळुरूचे संचालक, कर्नाटक राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक, एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक, बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी सहकारी संस्थेचे ६२ शाखांमधून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यात १० शाखा, एकूण १७२६.१७ कोटी रुपये व्यवहार, १२५५.९९ कोटी रुपये ठेवी, १८.३२ कोटी रुपये नफा झाला आहे.
तसेच दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक दि. रावसाहेब पाटील यांचे पुत्र असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत शुगर (साखर कारखाना) चे सीईओ, अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. अरिहंत साखर कारखान्याबरोबरच अरिहंत उद्योग समूहाच्या अंगसंस्था कन्नड, मराठी, इंग्रजी आणि सी.बी.एस.सी. माध्यमाच्या शाळा, महाविद्यालये यांचे माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत.
*विविध शर्यती*
बोरगाव पट्टणात जन्मदिवसाचे औचित्य साधून आंतरराज्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जोडवेत्तीनगाडी शर्यतीत प्रथम ५१००० रुपये, द्वितीय ३०००१ रुपये आणि तृतीय १५००१ रुपये तसेच एक बैलगाडी शर्यत आणि बिन दाती शर्यतीसाठी बक्षीस देण्यात आली.
अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली असून, त्यांच्याबरोबर अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटी, अरिहंत को-ऑप स्पिनिंग मिल, विविधोददेश ग्रामीण कृषी सहकारी संघ, अरिहंत हालू उत्पादक संघ यांसारख्या अनेक को-ऑप सोसायट्यांचे संचालक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
बेळगावमध्ये अरिहंत हॉस्पिटल सुरू करून सर्वसामान्यांना सोयीस्कर दरात उपचार देण्याचे काम केले आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यातही ते अग्रेसर आहेत.









