विशाल क्रांती प्रतिनिधी – रामनाथ डेंगळे
पट्टण कोडोली, कोल्हापूर जिल्ह्यातील रुई बंधारा पंचगंगा नदीवर जेवण करण्यासाठी गेलेल्या एकाचा पोहताना बुडून मृत्यू.
पट्टण कोडोली येथील बिरु बापु पुजारी वय वर्षे 51 हे त्यांच्या अन्य मित्रांन सोबत दिनांक 10-11-2026 रोजी दुपारच्या दरम्यान जेवण करण्यासाठी गेले होते.त्या वेळ बिरु पुजारी हे पोहण्यासाठी पंचगंगा नदीत उतरले असता खोल पाण्यात बुडाले असता त्यांचा शोध पोलीस व रेस्क्यु टिम नातेवाईक यांनी सुरू केला तर मिळुन आले नाहीत.दुसर्यादिवसी बचाव पथकला मयत अवस्थेत सकाळी 10 वा च्या सुमारास मिळुन आले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले व नातेवाईक यांच्या ताब्यात सोपविण्यात आले या घडलेल्या घटनेची नोंद अरविंद पुजारी यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दिली असून याचा अधीक तपास पोलिस हवालदार मोरे हे करत आहेत.









