_“अन्नदात्याच्या हितसाठी आमचा सहकार”_
_वार्ता : अनिलकुमार डेक्कण्णावर, सदलगा_
_हळींगली (बागलकोट) :_ शेतकऱ्यांच्या संकटाला सरकारे प्रतिसाद देत नसल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, अहिंसा, सत्य, करुणा आणि सर्व जीव हिताय या तत्त्वाखाली आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांनी सुरू केलेल्या उपवास सत्याग्रहाचा आज १२ वा दिवस आहे.
ऊसाला एकूण ५५०० रुपये दरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या एक महिन्यापासून शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत महाराजांनी हळींगली गावात उपवास सत्याग्रह सुरू केला आहे.
ठिकाणी शेकडो शेतकरी, भाविक येऊन आचार्यांना पाठिंबा देत आहेत. “अन्नदाता टिकला तर देश टिकेल” हा संदेश देणाऱ्या या सत्याग्रहाला कर्नाटकभरातून पाठिंबा व्यक्त होत आहे.









