Edition

मायक्रो फायनान्सचा एकही प्रतिनिधी आता महिलांच्या दारात फिरकणार नाही – शिराळा तालुका काँग्रेसचा निर्वाळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा (प्रतिनिधी) – गोरगरीब व वंचित महिलांवर मायक्रो फायनान्स, पतसंस्था व खाजगी सावकारांकडून होत असलेल्या बेकायदेशीर व सक्तीच्या वसुलीविरोधात शिराळा तालुका काँग्रेसने आज आरपारची भूमिका घेतली.
गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू-मटका, स्मार्ट मीटर व महावितरणच्या मनमानी आणि रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आंदोलने करूनही प्रशासनाला जाग आली नाही. त्यातच २४% ते ३५% पर्यंत सावकारी व्याज आकारून महिलांची पिळवणूक सुरू असल्याने आज शिराळा येथील चैतन्य, स्वतंत्र, नाबार्ड, ग्रामीण-कुटा फायनान्स आणि इस्लामपूर-सावर्डे येथील श्रीराम, बुलढाणा फायनान्स व शोभाताई कोरे पतसंस्थेच्या कार्यालयांवर महिला व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हल्लाबोल केला.
हे आंदोलन रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. प्रगती खरे-चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
*महिला का संतप्त झाल्या?*
दुष्काळामुळे हाताला काम नाही, रोजगारासाठी दूर जावे लागते आणि जाण्या-येण्यातच मजुरी संपते. त्यात बचत गटाच्या नावाखाली भरमसाठ व्याज, हप्ता चुकल्यास रात्री ११-१२ पर्यंत घरात ठाण मांडून बसणे, दमदाटी आणि सामान उचलून नेण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबात हृदयविकार, मानसिक तणावाचे रुग्ण वाढले आहेत.
काँग्रेसने यापूर्वीच सर्व कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावून वसुली न्यायालयीन मार्गानेच करावी, घरोघरी जाऊन त्रास देऊ नये, असे बजावले होते. तरीही वसुली सुरूच असल्याने आज थेट कार्यालयात जाब विचारण्यात आला.
आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला – यापुढे बेकायदेशीर वसुलीसाठी कोणीही महिलांच्या घरी आल्यास पोलीस तक्रार, जिल्हाधिकारी व ग्राहक मंचाकडे तक्रार आणि फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच संपूर्ण तालुकाभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
या दबावानंतर संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यापुढे घरोघरी येऊन वसुली न करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी डॉ. प्रगती खरे-चव्हाण म्हणाल्या, शेतमालाला रास्त भाव नाही, निर्यात बंदी उठत नाही, मग महिला कर्ज फेडणार कुठून? आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहोत.
ॲड. रवि पाटील यांनी यावेळी बोलताना तालुक्यात सुमारे १० हजार महिला या कर्जाच्या विळख्यात अडकल्या आहेत. त्यांना न्याय आणि कायदेशीर मार्गदर्शन देण्यासाठी लवकरच शेडगेवाडी येथे भव्य महिला मेळावा घेतला जाणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काँग्रेसच रस्त्यावर उतरून लढत आहे, हे यातून पुन्हा सिद्ध झाले.
यावेळी प्रा. सम्राट शिंदे, राजाभाऊ चरणकर, कृष्णात पाटील, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!