कोल्हापूर, दि. २७ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती, वाळवा तालुका यांच्या वतीने आज कोल्हापूर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील यशाबद्दल आमदार सतेज पाटील यांचे अभिनंदन करून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे नुकसान होऊ नये, या भूमिकेतून वाळवा तालुक्यातील संघर्ष समिती सातत्याने आवाज उठवत आहे.
आ. सतेज पाटील यांचा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सत्कार..









