Edition

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ‘एज्युकेशन वर्ल्ड’च्या क्रमवारीत महाराष्ट्रात प्रथम; देशभरात चौदावे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अतिग्रे : शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘एज्युकेशन वर्ल्ड’ मासिकाच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट डे कम बोर्डिंग स्कूल म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर या शाळेने चौदावे स्थान पटकावले आहे. या दुहेरी यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

नवी दिल्ली येथील एरोसिटीमधील हॉटेल पुलमन येथे आयोजित दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात लोकप्रिय भोजपुरी अभिनेते तथा पूर्व दिल्लीचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने प्राचार्य डॉ. एच एम नवीन आणि प्राचार्य अस्कर अली यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘एज्युकेशन वर्ल्ड’ मासिकाचे संस्थापक दिलीप ठाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन शाह उपस्थित होते.

शाळेने महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय घोडावत यांनी आनंद व्यक्त केला. हे यश शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक वाटचालीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे विश्वस्त विनायकजी भोसले यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यासह राष्ट्रीय स्तरावर शाळेचा नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
शाळेच्या संचालिका सस्मिता मोहंती यांनी या यशामागे गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि संस्थेतील सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न असल्याचे सांगितले. बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, प्रायमरी स्कुलच्या उपप्राचार्या अर्चना पाटील, सेकेंडरी स्कुलचे उपप्राचार्य नितीन माळी, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापन यांच्या समन्वयातूनच शाळेला शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थान प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात प्रथम आणि राष्ट्रीय स्तरावर चौदावे स्थान मिळविण्याची कामगिरी ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची साक्ष असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

भीमाशंकर जंगलतोडीवरून राजकीय वातावरण तापले; टोरंट पॉवरच्या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न, ३ लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप; कंपनी आणि वनविभागाकडून नियमांचे पालन केल्याचा दावा

traffic tail
error: Content is protected !!