Edition

हातकणंगले दुष्काळग्रस्त यादीतून वगळले; शेतकरी संतापले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हातकणंगले प्रतिनिधी – प्रविण केर्ले,
राज्य सरकारने खरीप हंगामासाठी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हातकणंगले तालुक्याचा समावेश न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, भुईमूगसह प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेला असून उत्पन्न हाती येण्याची शक्यता कमी झाली आहे. तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास आर्थिक मदत, पीकविमा आणि सवलतींपासून शेतकरी वंचित राहतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या निर्णयावर खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने आणि आमदार राहुल आवाडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

traffic tail

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

error: Content is protected !!