Edition

ट्रक-मोटारसायकल अपघातात गणेश मोपगार यांचा दुर्दैवी मृत्यू; एकसंबा परिसरात हळहळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

एकसंबा-चिक्कोडी मार्गावरील नणदीवाडी गावाजवळ ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकसंबा येथील रंगभूमी कलाकार, एसटीचे निवृत्त वाहक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर मोपगार (वय ६३) यांचा गुरुवारी (ता.१५ ऑक्टोबर) सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे एकसंबा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश मोपगार हे काही कामानिमित्त मोटारसायकल वरून चिक्कोडी येथे जात असताना नणदीवाडी गावातील टाइल्स दुकानाजवळ ट्रकला मागून दुचाकीची धडक बसली.

या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चिक्कोडी येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

रंगभूमी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते हरपले
गणेश मोपगार हे एसटी महामंडळातून वाहक म्हणून निवृत्त झाले होते.

त्याचबरोबर त्यांची रंगभूमी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एकसंबा परिसराने एक कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यात योगदान देणारा कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणेश मोपगार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एकसंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

traffic tail

चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कटिबद्ध : सरपंच श्रद्धा पोद्दार विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार; ग्रामपंचायत प्रशासनाकडून बदनामी करणाऱ्यांना कडक इशारा

error: Content is protected !!