Edition

महायुतीत खळबळ: फडणवीसांच्या दाव्याला २४ तासांत शिंदे सेनेचा शह; पुण्यात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी प्रविण केर्ले : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल, अशी घोषणा केली. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासांत शिंदे यांच्या शिवसेनेने पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अपक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

या मतदारसंघात शिंदे गटाने सुरुवातीला मंगेश चिवटे यांना ‘एबी’ फॉर्म दिला होता; परंतु वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटीनंतर त्यांना माघार घ्यावी लागली. तरीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिंदेंचा राजकीय संदेश स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे. पुण्यापाठोपाठ अमरावतीच्या विधान परिषद जागेवरूनही मित्रपक्षांत संघर्ष उफाळला आहे.

दरम्यान, महायुतीच्या दोन महत्त्वाच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांनी केलेली गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. ‘वर्षा’ येथील दुष्काळ आढावा बैठक आणि कचरा व्यवस्थापनाबाबतच्या बैठकीकडे शिंदेंनी पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे निर्णय रेटले जात असताना शिंदे सेनेला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना शिवसेनेत बळावत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचे वर्चस्व वाढत असून जागावाटप आणि उमेदवारीत शिवसेनेची राजकीय स्पेस आकुंचन पावत आहे. त्यामुळे २०२९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांपर्यंत महायुती टिकेल का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. पुण्यातील निकाल महायुतीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार असून, युती तुटण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळू शकते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

error: Content is protected !!