इचलकरंजी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तसेच प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु. श्रुती अंगडी व राहूल येसरे यांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे प्रेसिडेंट रो.शितल उपाध्ये, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.अरुणजी भंडारे, ट्रेझरर रो.प्रकाश मोरबाळे, सेक्रेटरी रो.सतीश मेटे, प्रोजेक्ट चेअरमन रो.सुनील मांगलेकर, चार्टर प्रेसिडेंट रो.गिरीश कुलकर्णी, रो.अमित खानाज,रो. मयूर पाटील, रो.श्रीहरी कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मांगलेकर, उपाध्यक्ष राजू नदाफ, खजिनदार विजय हावळ, सदस्य महेश खांडेकर, प्रमोद इदाते, श्रीमती शैला गायकवाड, रफिक मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रेसिडेंट रो. शीतल उपाध्ये आणि पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.अरुण भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणे हेच खऱ्या अर्थाने समाजसेवेचे मर्म आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही मान्यवरांनी दिली.
राजू नदाफ यांनी आपल्या मनोगतात वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रेरणादायी व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते आणि यशाचा मार्ग सुकर होतो, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी गती मिळणार आहे. तसेच कु. श्रुती अंगडी हिला रत्नागिरी व राहूल येसरे याला भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच इंजिनियरींग प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रेरणा
मा.विकास खारगे साहेब अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग महाराष्ट्र राज्य,
महापौर मा.उदय धातुंडे साहेब, उपमहापौर अनिल डाळ्या साहेब,विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील साहेब, सौ.विद्या साळुंखे सभापती शिक्षण समिती,सर्व पक्षांचे गटनेते, आयुक्त मा.सौ.पल्लवी पाटील मॅडम, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे मॅडम,सर्व उपायुक्त, सहा.आयुक्त, शिक्षणाधिकारी मा.बी.एम.कासार साहेब, प्रशासनाधिकारी ,इचलकरंजी महानगरपालिका पदाधिकारी, यांची तर मार्गदर्शन मा.शंकर पोवार मुख्याध्यापक,डॉ.अलका शेलार मॅडम मुख्याध्यापिका,राजेंद्र घोडके पर्यवेक्षक,पी.ए.पाटील सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जाधव मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.









