Edition

सेलू शहरात अल्पवयीन वाहनचालकांच्या बेफाम वेगाला आळा घाला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

मुली-महिलांना त्रास देणार्‍यांवर कठोर कारवाई कराः अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी.

सेलू : दि.15 सेलू शहरात अल्पवयीन मुलांकडून बेफाम वेगाने मोटारसायकल चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या तसेच मुली व महिलांना त्रास देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालुका सचिव गंगाधर कान्हेकर, तालुका सहसचिव सुनील गायकवाड, पर्यावरण प्रमुख नागोराव देशमुख, मंजुषा कुलकर्णी, के. जी. कुलकर्णी, देवेंद्र अण्णा कुरा, रमेशराव गीते, शुकाचार्य शिंदे आदींच्या आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस निरीक्षकांना एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे, सेलू शहरातील विविध रस्त्यांवर काही अल्पवयीन मुले सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्यावरून जाणार्‍या मुली व महिलांना पाहून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढणे, अचानक वाहनांचे कट मारणे आणि बेदरकारपणे वाहन चालविणे, असे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे पादचारी, विद्यार्थी, महिला आणि अन्य वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबवावी, अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणार्‍या पालकांची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुली व महिलांना त्रास देणार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, शहरातील नियमित पोलीस गस्त वाढवावी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवणे, महिलांची सुरक्षा सुनिश्‍चित करणे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करणे यासाठी पोलीस प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका ग्राहक पंचायतीने मांडली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!