Edition

आदर्श बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल पाटील यांचे अपघाती निधन बोरगावजवळ भीषण अपघात; बँकिंग व सामाजिक क्षेत्रात शोककळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा / प्रतिनिधी अनिलकुमार डेक्कण्णावर
आदर्श बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अमोल भूपाल पाटील यांचे शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास बोरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बँकिंग क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अ‍ॅड. अमोल पाटील यांच्या निधनाने आदर्श बँकेच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सर्व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!