Edition

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

आज कर्नाटक राज्याच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन डिसेंबर महिन्यात होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सविस्तर चर्चा केली.

मागील वर्षी सीटीईटी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांचे अंतर, प्रवासाची गैरसोय तसेच इतर प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागले होते. यंदा अशा समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्याची विनंती केली.

विशेषतः आपल्या चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातच सीटीईटी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून चिकोडी व परिसरातील परीक्षार्थींना दूरवर प्रवास करावा लागू नये आणि त्यांना सोयीस्कर वातावरणात परीक्षा देता येईल, अशी आग्रही मागणी मांडली.

यासंदर्भात आवश्यक त्या प्रशासकीय व्यवस्था, परीक्षा केंद्रांचे नियोजन तसेच परीक्षार्थींच्या सोयीसुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

विद्यार्थी व परीक्षार्थींचे हित हेच आपले प्रथम प्राधान्य असून, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन सीबीएसईचे बेळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन एस. देशपांडे यांनी दिले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!