Edition

शाळा खोल्यांचे बांधकाम आणि जैन बसदीच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी मंजूर आमदार श्री.प्रकाशअण्णा हुक्केरी आणि आमदार श्री.गणेशअण्णा हुक्केरी यांच्या प्रयत्नांना यश.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी चिकोडी.

वायव्य शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.प्रकाशअण्णा हुक्केरी आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार श्री.गणेशअण्णा हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नांतून बेळगाव, खानापूर आणि चिकोडी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचा विकास तसेच जैन बसदीच्या जीर्णोद्धारासाठी एकूण 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शिक्षण संस्था आणि शाळा सुधारणा समित्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 35 लाखांचा निधी
वायव्य शिक्षक मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी ‘मलेनाडू प्रदेश विकास मंडळा’कडून एकूण 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

याचा तपशील खालीलप्रमाणे: 10 लाख रुपये: खानापूर तालुक्यातील अनुदानित जनता शिक्षण संस्था प्रसार समिती, इटगी येथील हायस्कूलच्या आवार विकासासाठी 10 लाख रुपये, बेळगाव तालुक्यातील डी. एम. एस. मंडळाच्या शिवराज हायस्कूल, बेनकनहळ्ळी येथे नवीन शाळा खोलीच्या बांधकामासाठी 15 लाख रुपये, खानापूर तालुक्यातील मुकबसव नगर येथील सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेत नवीन वर्गखोलीच्या बांधकामासाठी तर चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील श्री भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (बसदी) च्या जीर्णोद्धारासाठी 15 लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे.

या भरघोस निधीमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध होणार असून, इंगळी येथील जैन बसदीचे रूपही पालटणार आहे.

या विकासकामांना मंजुरी मिळाल्याबद्दल स्थानिक नागरिक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि जैन बांधवांकडून दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!