Edition

लोकनेते, पद्मभूषण, दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दलित सेना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे कट्टर पुरस्कर्ते, पद्मभूषण सन्मानित, माजी केंद्रीय मंत्री, लोक जनशक्ती पार्टी व दलित सेनेचे संस्थापक, दलित-शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते आदरणीय रामविलासजी पासवान यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त ताडीवाला रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या सभागृहात अभिवादन सभा संपन्न झाली.

यावेळी रामविलासजी पासवान यांच्या प्रदीर्घ संसदीय व सामाजिक कार्याचा जागर करण्यात आला तसेच त्यांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मोहनराव वाडेकर,
ज्येष्ठ विचारवंत प्रा. विकास देशपांडे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे, दिलीप जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण, नितीन कांबळे, प्रीतम भोसले, राजू आल्हाट, सतीश बनसोडे, जनार्दन जगताप, महेश गायकवाड यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय संस्थेचे सर्व पदाधिकारी व अभ्यासिकेतील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे कार्यवाह-सचिव सुजित यादव यांनी केले, तर सूत्रसंचालन व आयोजन दलित सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल यादव यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!