Edition

दापुरी खुर्द परिसरात वीजपुरवठा खंडित; लाईनमन कलीम शेख यांचा मोबाईल बंद असल्याचा नागरिकांचा आरोप थकीत वीजबिलासाठी ग्राहकांना वारंवार फोन; मात्र वीजपुरवठा बंद झाल्यानंतर संपर्क होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द परिसरात मागील काही काळापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित लाईनमन कलीम शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ज्या ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वारंवार फोन करून तगादा लावला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मात्र, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार किंवा मदतीसाठी संपर्क साधताना संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दापुरी खुर्द परिसरातील ‘आखुडे’ काढण्याबाबतही टाळाटाळ?
दापुरी खुर्द परिसरात अनधिकृत वीजजोडण्यांसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप असलेल्या ‘आखुडे’ काढण्याच्या कारवाईबाबतही लाईनमन कलीम शेख यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करून अनधिकृत वीजजोडण्या आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एका बाजूला थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांशी वारंवार संपर्क केला जात असताना, दुसऱ्या बाजूला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय, परिसरातील अनधिकृत वीजजोडण्यांबाबत काय कारवाई करण्यात आली आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा मोबाईल बंद का होता, याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!