Edition

जोल्ले चॅरिटी फाउंडेशनकडून मुख्याध्यापक श्री.व्ही. आर. भिवसे सर यांना ₹67,200 ची वैद्यकीय मदत आकस्मिक अपघातानंतर शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचा हात; सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एकसंबा, ता.चिकोडी येथील जोल्ले एज्युकेशन सोसायटी कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही. आर. भिवसे सर यांना आकस्मिक अपघातामुळे शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या कठीण प्रसंगी जोल्ले चॅरिटी फाउंडेशनच्या वतीने ₹67,200 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली.

श्री. व्ही. आर. भिवसे सर हे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून, त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. या मदतीमुळे उपचाराच्या काळात त्यांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला आहे.

आकस्मिक प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल जोल्ले चॅरिटी फाउंडेशन, तसेच माजी मंत्री श्री. अण्णासाहेब जोल्ले, निपाणी विभागाच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले, गुड्डू भैयाजी आणि बसू भैयाजी यांचे श्री.व्ही. आर. भिवसे सर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जोल्ले चॅरिटी फाउंडेशनच्या या सहकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विशालक्रांती न्यूज.
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!